Skip to main content

Posts

Showing posts from June, 2022

प्रेमाची उत्क्रांती

       आधुनिक मानवशास्त्राच्या प्रवर्तकापैकी ऐक इंग्लंडमधील विद्वान डाॅ.ब्रिफ्फो यांनी 'माता' (द मदर्स) नावाचा एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला आहे, त्याच्या आधाराने पुढील लेख लिहिला आहे. त्यावरुन कवींनी प्रेमाचे कितीही गोडवे गायिले तरी त्यांत सत्याचा फारसा संबंध नसतो हे उघड होईल. अर्थात यामुळे प्रेमाचे किंमत कमी होते असे नाही. ऑक्सिजन व हायड्रोजन हे दोन वायु एकजीव होऊन त्याचे पाणी का बनते, याचे कारण त्यांच्यामध्ये स्त्री पुरुषांसारखेच आकर्षण असते, असे एका प्रख्यात जर्मन तत्वज्ञाने लिहिले आहे. लोहचुंबकाकडे लोखंड का जाते? हे प्रेमच नव्हे काय? ऐकंदर जगातील सर्व घडामोडी प्रेमावरच आधारलेल्या आहेत, अशीच यावरून कल्पना होईल.  काही प्राण्यात समागम म्हणजे दोघांचे युद्धच असते आणि यांत नराला आणि मादीलाही गंभीर स्वरुपाच्या जखमा होतात, उदाहरणार्थ खेकड्यांचे काही पाय त्यांत जातात. ऐका लेखकाने उंटांसंबंधी लिहिले आहे की त्यांचा समागम झाल्याबरोबर उंटीण उंटावर हल्ला करून त्याला पळ काढायला लावते. कित्येक प्राण्यांत  याउलट प्रकार होऊन मादीला पळ काढावा लागतो, जसे गोरीला मांकडांमधील स...

विवाहसंस्थेवर आधुनिक आक्षेप

फ्रेंचमद्ये एक म्हण आहे की संसार सुरळीत चालायला पाहिजे असेल तर नवरा बहिरा आणि बायको आंधळी असावी. याचा अर्थ असा की दोघांनीही सहनशीलता दाखवावी. पण अलीकडे या सहनशीलतेची प्रवृत्ति कमी कमी होत आहे. ज्या काळी लोक परमार्थाकडेच लक्ष देत होते आणि संसारात सुख व्हायचे नाही असे धरुन चालत असे, तेंव्हा त्यांची बंड करण्याची प्रवृती नव्हती. परंतु आता परमार्थाला कोणी विचारत नाही आणि ऐहिक सुखालाच लोक महत्व देऊ लागले आहेत. तेंव्हा विवाहासारखी दुसरी शिक्षा नाही असे पुष्कळांना वाटु लागले आहे. कामवासनेच्या बाबतीत वयाचा प्रश्न महत्वाचा असतो हे पुष्कळांना कळत नाही. हा शरीरशास्त्राचा प्रश्न आहे आणि नीतिनियमांचा संबंध नाही. स्त्री नेहमी पुरुषापेक्षा लवकर म्हातारी होते आणि ती कितीही सुंदर असली तरी काही वयापलीकडे ती पुरुषाचे समाधान करु शकत नाही. यामुळेच पुरुषाचे वय झालें तरीही त्याला तरुण स्त्रीची ईच्छा असते आणि ही ईच्छा पुर्ण न झाली तर तो नेहमी अतृप्त राहतो. स्वत:च्या वयातीत स्त्रीशी जरी त्याने संबंध ठेवले तरी तो केवळ भुकेला कोंडा अशा स्वरुपाचा असतो आणि तिची नेहमीची सवय झाल्यामुळे तिचे आकर्षक आणखी कमी होते. यामु...