आधुनिक मानवशास्त्राच्या प्रवर्तकापैकी ऐक इंग्लंडमधील विद्वान डाॅ.ब्रिफ्फो यांनी 'माता' (द मदर्स) नावाचा एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला आहे, त्याच्या आधाराने पुढील लेख लिहिला आहे. त्यावरुन कवींनी प्रेमाचे कितीही गोडवे गायिले तरी त्यांत सत्याचा फारसा संबंध नसतो हे उघड होईल. अर्थात यामुळे प्रेमाचे किंमत कमी होते असे नाही. ऑक्सिजन व हायड्रोजन हे दोन वायु एकजीव होऊन त्याचे पाणी का बनते, याचे कारण त्यांच्यामध्ये स्त्री पुरुषांसारखेच आकर्षण असते, असे एका प्रख्यात जर्मन तत्वज्ञाने लिहिले आहे. लोहचुंबकाकडे लोखंड का जाते? हे प्रेमच नव्हे काय? ऐकंदर जगातील सर्व घडामोडी प्रेमावरच आधारलेल्या आहेत, अशीच यावरून कल्पना होईल.
काही प्राण्यात समागम म्हणजे दोघांचे युद्धच असते आणि यांत नराला आणि मादीलाही गंभीर स्वरुपाच्या जखमा होतात, उदाहरणार्थ खेकड्यांचे काही पाय त्यांत जातात. ऐका लेखकाने उंटांसंबंधी लिहिले आहे की त्यांचा समागम झाल्याबरोबर उंटीण उंटावर हल्ला करून त्याला पळ काढायला लावते. कित्येक प्राण्यांत याउलट प्रकार होऊन मादीला पळ काढावा लागतो, जसे गोरीला मांकडांमधील संबंध.
ऐका प्रवाशाने ऐका स्त्रीची प्रेम करण्याची पद्धत अशी वर्णिली आहे. 'कुत्रे जसे धन्याला प्रेमाने चालतात, तशीच ती प्रथम माझी बोटें चावीत असे, नंतर तेथून हळूहळू खांद्यापर्यंत चावीत जात असे.' शेवटी या प्रवाशाला हे प्रेम बंद करावे लागलें, कारण त्याच्या सर्वांगावर जखमा झाल्या. काही गटात वराने वधूच्या स्तनग्राचा चावा घेतला म्हणजे ती वाड्:निश्चयाची खुण समजतात. ऐखादे वेळी ऐखादा प्रेमिक प्रेयसीला प्रेमाने म्हणतो तुला खाऊन टाकावेंसे वाटतें. त्याचे मुळ वरील भयंकर प्रकारात आहे.
विवाहाचे बाबतीत स्त्रिया मुख्यतः वराच्या कार्यक्षमतेचा विचार करतात. शक्ति, धैर्य कौशल्य, वगैरे जगांत यश मिळवण्यास उपयुक्त गुण ज्याच्या अंगी असतील, असाच वर त्या पसंत करतात. ऐका आधुनिक लेखिकेने आईबापांनी लग्न ठरवण्याच्या जुन्या पद्धतीची अतिशय स्तुति केली आहे. तिचे म्हणणे असे की त्यांनाच अनुभव जास्त असल्यामुळे त्यांनाच योग्य पतीची निवड करता येईल. अर्थात ती पैशाकडेच पाहील हे खरें, पण मुलें वाढवण्याच्या दृष्टीने पैशाची जरुरच असते, तेंव्हा यांत काही वावगे ठरणार नाही. असा जो मनुष्य असेल, त्यालाच त्या चिकटून राहतात. ज्यांच्याजवळ पैसा भरपूर असतो, त्याच ईतर गोष्टींकडे लक्ष देतात आणि मग कदाचित अपत्यप्रेमाचा प्रवाह पतीकडे जाऊन त्या एखाद्या अशक्त, पंगु माणसाचीच निवड करतील, पण हें प्रेम नसून दया असते. पण वराचे अंगी सामान्यतः जो गुण त्यांना पाहिजे असतो, तो आर्थिक उपयुक्तता हाच होय. समागमक्षमता थोड्याबहुत प्रमाणांत असली म्हणजे झालें, तो मुख्य गुण नव्हे.
“To fear love is to fear life, and those who fear life are already three parts dead.” Bertrand Russell
Comments
Post a Comment