फ्रेंचमद्ये एक म्हण आहे की संसार सुरळीत चालायला पाहिजे असेल तर नवरा बहिरा आणि बायको आंधळी असावी. याचा अर्थ असा की दोघांनीही सहनशीलता दाखवावी. पण अलीकडे या सहनशीलतेची प्रवृत्ति कमी कमी होत आहे. ज्या काळी लोक परमार्थाकडेच लक्ष देत होते आणि संसारात सुख व्हायचे नाही असे धरुन चालत असे, तेंव्हा त्यांची बंड करण्याची प्रवृती नव्हती. परंतु आता परमार्थाला कोणी विचारत नाही आणि ऐहिक सुखालाच लोक महत्व देऊ लागले आहेत. तेंव्हा विवाहासारखी दुसरी शिक्षा नाही असे पुष्कळांना वाटु लागले आहे.
कामवासनेच्या बाबतीत वयाचा प्रश्न महत्वाचा असतो हे पुष्कळांना कळत नाही. हा शरीरशास्त्राचा प्रश्न आहे आणि नीतिनियमांचा संबंध नाही. स्त्री नेहमी पुरुषापेक्षा लवकर म्हातारी होते आणि ती कितीही सुंदर असली तरी काही वयापलीकडे ती पुरुषाचे समाधान करु शकत नाही. यामुळेच पुरुषाचे वय झालें तरीही त्याला तरुण स्त्रीची ईच्छा असते आणि ही ईच्छा पुर्ण न झाली तर तो नेहमी अतृप्त राहतो. स्वत:च्या वयातीत स्त्रीशी जरी त्याने संबंध ठेवले तरी तो केवळ भुकेला कोंडा अशा स्वरुपाचा असतो आणि तिची नेहमीची सवय झाल्यामुळे तिचे आकर्षक आणखी कमी होते. यामुळे पुष्कळांना स्वत:च्या बायकोपेक्षा ईतरांच्या बायका सुंदर दिसतात. स्वत:ला त्यात बिलकुल समाधान वाटत नसतानाही कित्येक पुरुष पत्नीच्या समाधानाकरतां समागम पार पाडतात, पण पुष्कळांना ते अशक्य होते आणि ते पत्नीपुरते नपुंसक होतात. विवाहसंस्थेत या शारीरिक सत्याला मान्यता नसते. पुर्वी हिंदुंना जास्त बायका करता येत असत, तेव्हां त्यांना परवडेल ते ऐक बायको वयातीत झाल्यावर एखादी नवी तरुण बायको करीत असंत आणि तिचे समाधान करण्याची ताकतही त्यांना असे. पण आता कायद्याने ते अशक्य केले आहे. विवाहात असमाधान वाटण्याचे हे एक मोठे कारण आहे. पुर्वीच्या बायकांनाही हे समजत असे आणि त्या नवऱ्याचे दुसरे लग्न करुन द्यायला मदतही करत असतं. हल्लीच्या बायका आपले हक्क घेऊन बसतात, आणि त्यांनाही त्यांत सुख मिळत नाही. हक्क कायद्याने मिळतात पण प्रत्यक्षात या कायदेशीर हक्कांना किंमत नसते. दुसरे लग्न न करता आले तरी पुरुष दुसरीकडे जात नाहीत असे नाही. जुन्या बायकांना मुले झाले म्हणजे त्यांतच त्या म्हातारपणी समाधान मानीत असत आणि नवऱ्याला जखडुन ठेवण्याचा फोल प्रयत्न करीत नसतं.
ज्यांना कोणत्याही कारणाने विवाह करणे शक्य नसेल त्यांनी समागम (sexual intercourse) करु नये, ही समाजाची अपेक्षा. हा धडधडीत अन्याय आहे हे काय सांगायला पाहिजे? आजकालच्या बिकट परिस्थितीत तर बायकोला पोसण्याची जवाबदारी अंगावर घेणे ज्यांना परवडणार नाही, अश्यांची संख्या पुष्कळच वाढली आहे. वेश्या सर्व समाजात असतात पण त्यांचा उपयोग उघडपणे करता येता नाही, कारण तो समाजाला मान्य नाही. हा अन्याय ईतक्या लोकांनी का सहन करावा? असा उघड अन्याय करणाऱ्या संस्थेबद्ल कोणाला का आदर वाटावा? ज्या देशात विवाहाशिवाय समागम अशक्य असतो, त्या देशात असे हाल सहन करण्याता प्रसंग पुष्कळांवर येतो.
Comments
Post a Comment