भारताचे कायदे विचीत्र आहेत. इथे समानतेच्या मोठ्या गप्पा मारल्या जातात परंतु प्रत्यक्षात कायदाच समान हक्क देत नाही. या संबधीची एक सर्वात खटकणारी बाब म्हणजे हिंदु पुरुष असेल व त्याची एका पेक्षा अधिक स्त्रीयांशी विवाह करण्याची आकांक्षा/ क्षमता असेल आणि संबंधित स्त्रीयांची ही आनंदाने या विवाहाला संमती/तयारी असेल तरी एका हिंदु पुरुषाला भारताचा कायदा द्विभार्या प्रतिबंधन घालुन हा हक्क नाकारतो. आणि त्याच वेळी इतर धर्मीयांस ही परवानगी देतो. यात कसली आलीय समानता? असा प्रतिबंध नेमका कोणत्या भुमिकेतुन हिंदु प्रुरुषांवर लादण्यात आलेला आहे याची माहीती नाही. म्हणजे हिंदु पुरुषांना ही एकपत्नीव्रता ची जाचक अट का कायद्यात घातली यामागे हिंदुंची कोणती परंपरा गृहीत धरण्यात आलेली होती याची मला माहीती नाही( जाणुन घेण्याची आकांक्षा आहे) कारण अपवादात्मक उदाहरणे सोडली तर बहुपत्नीत्व हे हिंदु परंपरेचे एक महत्वाचे लक्षण आहे. एका एकपत्नीव्रती महापुरुषाच्या विरोधात शंभर बहुपत्नीव्रती महापुरुषांची उदाहरणे देता येतील,मग हा कायदा बनवितांना कोणती मुळ परंपरा गृहीत धरण्यात आली होती माहीत नाही.या कायद्याने हिंदु पुरुषांच्या एकापेक्षा अधिक विवाह करण्याच्या आणि संबधित विवाहास संमती असणारया स्त्रीयांच्या ही असा विवाह करण्याच्या मुलभुत मानवी हक्कांवर गदा येते यात शंका नाही.याने अनेक हिंदु पुरुष आणि स्त्रीया विवाहाच्या सहजीवनाच्या नैसर्गिक आनंदाला पारखे होतात.
आता असे विवाह करण्याची आकांक्षा असलेल्या हिंदु पुरुषांना कायद्यात तरतुद नसल्याने मग निष्कारण चुकीचे मार्ग अवलंबाबे लागतात. कायद्याच्या भीतीने त्यांना त्यांच्या नैसर्गिक प्रेमभावने वर बंधन घालावे लागते.अन्यथा निष्कारण मग धर्मांतराचा मार्ग अवलंबवावा लागतो. आजकाल तर केवळ विवाहसाठी जर कोणी धर्मांतर करीत असेल तर त्यालाही परवानगी असणार नाही असा काहीतरी कायदा अस्तित्वात आल्याची माहीती आहे. म्हणजे हिंदु पुरुषांना आजपर्यंत जो एक मार्ग होता धर्मांतर करुन असा विवाह कायदेशीर करण्याचा( ज्यात धर्मांतराची अत्यंत चुकीची सक्ती होती तरीही तो त्याग प्रेमासाठी सहन करुन कीमान असा विवाह करण्याची संधी होती) आता ती ही काढुन टाकण्यात आलेली आहे. मग बहुपत्नीकांक्षी हिंदु पुरुषाने आता करावे तरी काय? हा जाचक कायदा बदलायलाच हवा व इतर धर्मीयांप्रमाणेच हिंदु पुरुषांनाही एकापेक्षा अधिक स्त्रीयांशी विवाह करण्याची परवानगी देउन सर्वाना समान हक्काची घटनेच्या तत्वाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली पाहीजे.
याचा सर्वात मोठा फ़ायदा म्हणजे मग संबधित दुसरया स्त्री ला व तिच्या संततीला ही मग व्यवस्थित कायद्याचे पुर्ण संरक्षण मिळते व समाजात मानाने वावरण्याची संधी मिळते. म्हणजे वरील बंधनामुळे चोरटे संबंध ठेवण्याकडे जो कल वाढतो व त्यामुळे कायदेशीर हक्कांसंबधित ज्या समस्या निर्माण होतात त्याही टाळता येउ शकतात.
Comments
Post a Comment