आधुनिक मानवशास्त्राच्या प्रवर्तकापैकी ऐक इंग्लंडमधील विद्वान डाॅ.ब्रिफ्फो यांनी 'माता' (द मदर्स) नावाचा एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला आहे, त्याच्या आधाराने पुढील लेख लिहिला आहे. त्यावरुन कवींनी प्रेमाचे कितीही गोडवे गायिले तरी त्यांत सत्याचा फारसा संबंध नसतो हे उघड होईल. अर्थात यामुळे प्रेमाचे किंमत कमी होते असे नाही. ऑक्सिजन व हायड्रोजन हे दोन वायु एकजीव होऊन त्याचे पाणी का बनते, याचे कारण त्यांच्यामध्ये स्त्री पुरुषांसारखेच आकर्षण असते, असे एका प्रख्यात जर्मन तत्वज्ञाने लिहिले आहे. लोहचुंबकाकडे लोखंड का जाते? हे प्रेमच नव्हे काय? ऐकंदर जगातील सर्व घडामोडी प्रेमावरच आधारलेल्या आहेत, अशीच यावरून कल्पना होईल. काही प्राण्यात समागम म्हणजे दोघांचे युद्धच असते आणि यांत नराला आणि मादीलाही गंभीर स्वरुपाच्या जखमा होतात, उदाहरणार्थ खेकड्यांचे काही पाय त्यांत जातात. ऐका लेखकाने उंटांसंबंधी लिहिले आहे की त्यांचा समागम झाल्याबरोबर उंटीण उंटावर हल्ला करून त्याला पळ काढायला लावते. कित्येक प्राण्यांत याउलट प्रकार होऊन मादीला पळ काढावा लागतो, जसे गोरीला मांकडांमधील स...
This is a blog for law students and Lawyers.