🌴मुसलमानी कायद्यातील तलाक व प्रकार : मुसलमानी कायद्याप्रमाणे पुरुष ‘तलाक’ हा शब्द त्रिवार उच्चारून बायकोस केव्हाही सोडू शकतो. त्याकरिता काही कारणे सांगण्याचे त्याच्यावर बंधन नाही. ‘तलाक’ तो तोंडी व लेखीही घेऊ शकतो. तो पत्नीच्या उपस्थितीत तसेच अनुपस्थितीत घेऊ शकतो. ‘इला', ‘झिहार’, ‘लिअन’, 'खुला’ किंवा ‘मुबारत’ असे घटस्फोटाचे आणखी चार प्रकार मुसलमानी कायद्याने सांगितले आहेत. ‘खुला’ किंवा 'मुबारत’ दोघांच्या संमतीने घेण्यात येतो. पत्नीकडून घटस्फोटाकरिता पुढाकार घेण्यात आला, तर त्यास खुला म्हणतात. ‘मुबारत’ मध्ये दोघेही परस्परांना विटून घटस्फोट घेण्यास सहमत होतात. मुसलमानी कायद्याचे वैशिष्ट्य म्हणजे घटस्फोटाकरिता न्यायालयाच्या हुकूमनाम्याची आवश्यकता लागत नाही. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे घटस्फोट घेण्याचा अधिकार मुसलमानी कायद्यान्वये दुसऱ्यास दिला जाऊ शकतो. मुसलमानी कायद्यातील घटस्फोटासंबंधीच्या वरील तरतुदी मुसलमानी कायद्याप्रमाणे विवाह करणाऱ्या एडन, ब्रूनाई, श्रीलंका, केन्या, पाकिस्तान, सिंगापूर, टांझानिया, इराक, इराण व भारत या देशांतील लोकांना लागू आहेत. या कायद्यान्वये मुसलमान प...