# कॉपीराईट कायदा© :
(This is a copyright information written by Author Vishnu Karle. No part of this information may be used for any selling purposes or for rewriting, video, audio modes, recording...etc. This can be used for any purposes by obtaining the express permission from the author. Email. vvkarle7@gmail.com).
प्रस्तावना:
कोणत्याच लेखकाला असे कधी पाहायला आवडणार नाही की त्याने केलेले कठीण परिश्रमाचे कार्य कोणीतरी चोरावे किंवा लेखकावरच चोरीचे आरोप लावावेत. कॉपीराईट कायदा तुम्ही स्व:त केलेल्या लिखाणाला सौरंक्षण देतो. कोणीही तुमच्या लिखाणाची चोरी करु शकत नाही. आणि जर कोणी दुसर्याचे कार्य चोरी केले, तर त्यास या कायद्याअंतर्गत शिक्षा केली जाते.
तुम्ही केलेल्या लिखाणाचे कॉपीराईट कायद्याअंतर्गत नोंदणी करता येेते. त्यामुळे कोणीही ती माहिती तुमच्या व्यतिरिक्त ती प्रकाशीत करु शकत नाही. पण कॉपीराईट अधिकाराचे हस्तांतरण दुसर्या व्यक्तीस केले जाऊ शकते/करता येते.
#कॉपीराईट कायद्याअंतर्गत खालील सुरक्षा मिळते :
१.तुम्ही स्वत केलेल्या लिखाणाची नोंदणी करता येते.
२.तुमच्या कार्याचे सौरक्षण केले जाते. तुमच्या परवानगी शिवाय कोणतेही व्यक्ती तुमच्या लिखाणाचे प्रकाशन करु शकत नाही.
३. लिखाणाची चोरी करणार्यांना या कायद्याअंतर्गत शिक्षा दिली जाते.
# कॉपीराईट कायदा कोणासाठी आहे?
जर तुम्ही लेखक आहात - कादंरीकार किंवा लघुकथा लेखक, कवी, नाटककार, स्क्रीनरायटर, चरिञलेखक, इतिहासकार, वैन्यानिक व तांञिक लिखाण करणारे, नॉन फिक्शन विषयी लिहिणारे, प्रकाशीत किंवा नप्रकाशीत लेखक, पञकार, ब्लॉग लिहिणारे, फ्रिलान्स लेखक, दुसर्या व्यक्तीसाठी लिखाणाचे काम करणारे, मासिकात किंवा पुस्तक प्रकाशनात काम करणारे संपादक, नोंदणीक्रत प्रकाशक, ग्रंथकार, शिक्षक किंवा साहित्याच्या क्षेञात काम करणारे असाल...तर या कायद्याअंतर्गत तुम्हाला तुम्ही केलेल्या लिखाणाचे सौरक्षण मिळते. पण यासाठी तुम्हाला कॉपीराईट कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे.
# कॉपीराईट कायद्याअंतर्गत खालील कार्याचेसुद्धा सौरक्षण करता येते:
१. संगीत, चिञ, ध्वनी-चिञफिती, संशोधन, टाईटल्स, लोगो, घोषवाक्ये, विचार, शब्द सुद्धा.व व्यवसायातील गुपिते...ई.
२.जर तुम्ही कॉपीराईट केलेले कार्य कोणी चोरले तर तुम्ही त्या व्यक्तीवर दावा दाखल करु शकता.
३.कॉपीराईट केलेल्या कार्याचे मालकाच्या परवानगीशिवाय कोणी पण वापर करु शकत नाही.
# कॉपीराईट कायद्याअंतर्गत कशा प्रकारे सौरक्षण मिळते?
कॉपीराईट त्याच क्षणी आमलात येतो जेव्हां तुम्ही एखादे लिखाण टाईप करता, संगणकात लिहिता, स्व:तच्या हस्तक्षरात लिहिता. जसे, तुम्ही प्रकाशीत करता तेंव्हा तुम्हाला कॉपीराईट कार्यालयात जाऊन त्याची नोंद करावी लागत असते. तसेच, कॉपीराईट केल्याची सुचना ही प्रकाशीत करणे आवश्यक आहे.
# एखादे लिखाण कॉपीराईट आहे किंवा नाही हे कसे समजावे?
एखादे लिखाण कार्य प्रकाशीत किंवा अप्रकाशीत आहे यावरुन ते कॉपीराईट आहे की नाही ते ओळखता येते. जेव्हां एखादे लिखाण हे प्रकाशीत असते व ते विकले जाते, करारावर दिले जाते, तर ते कॉपीराईट आहे असे समजावे.
# नोंदणी (Registration) -
तुम्ही केलेल्या कार्याची नोंदणी करण्यासाठी कॉपीराईट कार्यालयात जाऊन फॉर्म भरावा लागतो व त्यासोबत तुमच्या कार्याची/ लिखाणाची एक कॉपी कार्यालयात जमा करावी लागते.
# कॉपीराईट कशाची सुरक्षा करते :
कॉपीराईट लेखकाला स्व:त लिहिलेल्या शब्दांचे सौरक्षण करते. दुसऱ्या लेखकाचे चोरुन लिहिलेल्या कार्याचे कॉपीराईट करता येत नाही. कॉपीराईट कायद्याचा मुळ उद्देश हा एखादी नवीन संकल्पना निर्माण व्हावी व त्याचा ईतरांना लाभ व्हावा ही असते. त्यामुळे याचा लेखकाच्या बौद्धीक व कलात्मक कार्यनिर्मितीस चालना मिळते.
# कॉपीराईट किती दिवसासाठी असते:
लेखक जिवंत असे पर्यंत व लेखकाच्या म्रत्युनंतर ६० वर्षे. जर ते लिखाण दुसऱ्या देशातील असेल तर मुळ देशातील काळापेक्षा जास्त असत नाही.
# कॉपीराईट केलेले कार्य चोरणाऱ्यांसाठी काय शिक्षा केली जाते?
कॉपीराईट कायदा १९५७ च्या अंतर्गत हक्क गमवलेल्या लेखकाला खालील तीन अधिकार आहेत.
१. प्रशासकीय हक्कांअंतर्गत चोरी केलेल्या कार्याचा ताबा घेतला जातो.
२. नागरी कायद्याअंतर्गत नुकसानभरपाई मागता येते.
३. गुन्हेगारी कायद्याअंतर्गत गुन्हेगाराला कमीत कमी ३ वर्षे शिक्षा व २,००,००० रुपये दंडही आकारला जातो.
समाप्त!

Comments
Post a Comment