🌴तलाक किंवा घटस्फोटामुळे स्ञींना भोगाव्या लागणार्या यातना / निर्माण होणार्या समस्या:
घटस्फोटामुळे तापदायक वैवाहिक संबंध तोडण्याचे स्वातंत्र्य मिळाले असले, तरी त्यायोगे काही बिकट समस्याही निर्माण झाल्या आहेत. विशेषतः घटस्फोटित स्त्रीला अनेक कठीण प्रश्नांना तोंड द्यावे लागते. मुस्लीम समाजातील स्ञीयांना तर 'तीन तलाक' मुळे खुप समस्यांना सामोरे जावे लागते. स्त्री मिळवती किंवा अर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण नसेल, तर हे प्रश्न अधिकच जटिल बनतात. कायद्यात पोटगीची तरतूद केली असली, तरी त्यायोगे प्रश्न सुटत नाहीत. घटस्फोटित स्त्रीचा पुनर्विवाह सहजासहजी होत नाही. तिच्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बऱ्याच अंशी पूर्वग्रहदूषित असते. तिला जर मुले असतील, तर तिचा पुनर्विवाह होणे बव्हंशी अशक्य असते. पुनर्विवाहानंतर घटस्फोटितांच्या मुलांना होणारा सावत्रपणाचा संभाव्य जाच दृष्टिआड करता येत नाही. त्यांची वाढ सर्वसामान्य वातावरणात होत नसल्यामुळे त्यांच्यात मनोविकृती व इतर स्वभावदोष निर्माण होण्याची अधिक शक्यता असते. ती एकाकी व पोरकी होण्याचाही संभव असतो. जर घटस्फोटित व्यक्ती कर्तबगार, मिळवती त्याचप्रमाणे दृढ इच्छाशक्तीची नसेल, तर तीही अशीच एकाकी व पोरकी होते. मानसिक प्रश्न जरी महत्वाचे असले, तरी आर्थिक, लैंगिक त्याचप्रमाणे सामाजिक प्रतिष्ठेचे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे सुखी जीवन जगण्याचा वैयक्तिक उद्देश सफल होत नाही. उलट समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने ती एक चिंतेची बाब होऊन बसते. पाश्चात्त्य समाज घटस्फोटास अधिक निर्ढावलेला असला, तरी तेथेही विभक्त कुटुंबसंस्थेमुळे व नात्यागोत्यांचा परिघ कमी असल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

Comments
Post a Comment